आमच्याबद्दल

byk yog
book बीवायके योग (BYK Yog) आध्यात्मिक फोरम ही एक लोककल्याणकारी (गैरसरकारी) संस्था आहे. या संस्थेचे मुख्य ध्येय श्रीमद्भगवद्‌गीतेतील मूळ शिकवण समाजात सर्व स्तरांवर जागृत करण्याचे आहे.
या सॉफ्टवेअर व डिजिटल काळातील वैज्ञानिक युगात निर्माण झालेल्या गतिशील व आव्हानात्मक अशा व्यक्तिगत, कौटुंबिक व वैश्विक जीवनशैलीत समाजातील विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना श्रीमद्भगवद्गीतेतील मूळ शिकवणींची लौकिक जीवनात उपयुक्तता व प्रासंगिकता स्पष्ट करणे हा या संस्थेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.


भक्तियुक्त कर्मयोग म्हणजेच राजयोग साधना. ही योग पद्धती सनातन आहे. परंतु काळाच्या ओघात लुप्त झाल्यामुळे ती पुनर्जागृत करण्याचा हा उपक्रम आहे. भक्तियुक्त कर्मयोग साधना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक तसेच राजनैतिक आयुष्यात सुद्धा सुख, यश, स्थैर्य व समृद्धी प्राप्त करून देण्याची खात्री देते व व्यक्तीस राजयोगी बनवते. त्यामुळे राजनैतिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्रेष्ठवर, विद्वान मंडळी तसेच उद्योजक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग, कामगार बंधू, सर्व जाती-धर्मातील व सर्व वयोगटातील स्त्री- पुरुष व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती अशा सर्वांसाठी ती सारखीच प्रभावशाली व यश देणारी सोपी व सरळ अशी योगपद्धती आहे. देशाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी पण हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या देशाप्रती व ईश्वराप्रती असलेले ते उत्तरदायित्व आहे.
सनातन धर्माची ही शिकवण पुनर्जागृत होणे म्हणजे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस आत्मनिर्भर होण्याची ही विद्या शिकविणे व समाजात ती संस्कारीत करणे. देशातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समृद्ध, समाधानी होण्याच्या दृष्टीने सनातन धर्माची पुनर्जागृती हा एक महत्त्वाचा किंबहुना एकमेव पर्याय आहे. त्या प्रक्रियेतील हा एक छोटासा प्रयत्न आहे. हीच रामराज्य स्थापित होण्याची संकल्पना आहे.
या संस्थेचे कामकाज आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले स्त्री-पुरुष, BYK योगचे साधक व उद्योजक चालवितात. ही सेवाभावी स्वयंसेवी संस्था (NGO) देणगीदारांच्या देणगीवर, सभासदांच्या आर्थिक मदतीवर, देशातील सेवाभावी संस्थाच्या व सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने चालवली जाते.

पुस्तकाविषयी

प्रथम आवृत्ती : शनिवार, ३ डिसेंबर २०२२, ३००० प्रती, श्रीमद्भगवद्गीता ५१५९ वा जयंती दिवस
द्वितीय आवृत्ती: शारदीय नवरात्र - घटस्थापना, रविवार, १५ ऑक्टोबर २०२३, प्रती ६००० वितरण: विजया दशमी, मंगळवार, २४ ऑक्टोबर २०२३
तिसरी सचित्र आवृत्ती (परिक्षण आवृती): मंगळवार, १९ फेब्रुवारी २०२४, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, प्रती १५० वितरणः गुरुपुष्यामृतयोग, गुरूवार, २२ फेब्रुवारी २०२४
चतुर्थ आवृत्ती: आषाढी एकादशी, बुधवार, १७ जुलै २०२४, प्रती १०००
पाचवी आवृत्ती : विजयादशमी, शनिवार १२ आक्टोबर २०२४, प्रती ५०००
सहावी आवृत्ती (परिक्षण आवृत्ती): १००० प्रती
सातवी आवृत्ती: बुधवार, १ जानेवारी २०२५, २००० प्रती
पंडित, विवेचक व मार्गदर्शक :
श्रीमद्भगवदगीता, श्रीमद्भागवतम्, श्रीरामचरितमानस, शिवपुराण, देवीभागवतम्, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्रशाख, रत्नशास्त्र यांचे जाणकार व मार्गदर्शक.
वितरण प्रमुख :
सौ. वंदना रत्नाकर देशमुख
श्री. रत्नाकर बबनराव देशमुख
सौ. अनुश्री पियुष कोटेचा (देशमुख)
श्री. पियुष प्रकाश कोटेचा
प्रमुख सल्लागार :
डॉ. शरद गंगाधर भोगले
सौ. स्मिता शरद भोगले
कव्हर आणि सर्व रंगीत पृष्ठांची संकल्पना आणि संगणक ग्राफिक्स
श्री. अशोक अरविंदराव देशपांडे
मो. ९४२०२६७१२३
श्री. ललित रोहिदास गांगवे
श्री. श्रीनिवास केशवराव पहिनकर
विशेष योगदान: ह.भ.प.श्री. परशुराम विठ्ठलराव कुंदे
open book