आमच्याबद्दल
बीवायके योग (BYK Yog) आध्यात्मिक फोरम ही एक लोककल्याणकारी (गैरसरकारी) संस्था आहे. या संस्थेचे मुख्य ध्येय श्रीमद्भगवद्गीतेतील मूळ शिकवण समाजात सर्व स्तरांवर जागृत करण्याचे आहे.
या सॉफ्टवेअर व डिजिटल काळातील वैज्ञानिक युगात निर्माण झालेल्या गतिशील व आव्हानात्मक अशा व्यक्तिगत, कौटुंबिक व वैश्विक जीवनशैलीत समाजातील विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना श्रीमद्भगवद्गीतेतील मूळ शिकवणींची लौकिक जीवनात उपयुक्तता व प्रासंगिकता स्पष्ट करणे हा या संस्थेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
भक्तियुक्त कर्मयोग म्हणजेच राजयोग साधना. ही योग पद्धती सनातन आहे. परंतु काळाच्या ओघात लुप्त झाल्यामुळे ती पुनर्जागृत करण्याचा हा उपक्रम आहे. भक्तियुक्त कर्मयोग साधना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक तसेच राजनैतिक आयुष्यात सुद्धा सुख, यश, स्थैर्य व समृद्धी प्राप्त करून देण्याची खात्री देते व व्यक्तीस राजयोगी बनवते. त्यामुळे राजनैतिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्रेष्ठवर, विद्वान मंडळी तसेच उद्योजक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग, कामगार बंधू, सर्व जाती-धर्मातील व सर्व वयोगटातील स्त्री- पुरुष व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती अशा सर्वांसाठी ती सारखीच प्रभावशाली व यश देणारी सोपी व सरळ अशी योगपद्धती आहे. देशाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी पण हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या देशाप्रती व ईश्वराप्रती असलेले ते उत्तरदायित्व आहे.